मुंबई – शिवसेनेच्या दत्ता दळवींनी राजीनामा दिला की द्यायला सांगितला ?

मुंबई – शिवसेनेच्या दत्ता दळवींनी राजीनामा दिला की द्यायला सांगितला ?

शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱयांमध्ये असलेल्या गटबाजी वाद उद्धव ठाकरेंपुढे उघड झाल्याची घटना ताजी असताना विभागातला आणखी एक नवा वाद समोर आलाय. माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 7 चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे दिलाय. दळवी यांनी 7 ऑगस्टला आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. ‘सामाना’मध्ये ईशान्य मुंबईतील पक्षाच्या नव्या पदाधिकाऱयांच्या नेमणुका आज जाहीर करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील बातमीमध्ये दत्ता दळवी यांनी स्वतःच्या पदाच्या दिलेल्या राजीनाम्याचीही माहिती देण्यात आलीय. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं बातमीत म्हटलंय. पण दळवी यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला की उद्धव ठाकरेंनी त्यांना द्यायला लावला ? अशी चर्चा यानिमित्तानं पक्षात सुरु झालीय. दळवी यांच्या राजीनाम्यामागे काही वेगळी वादग्रस्त कारणं असल्याची चर्चा आहे.

चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर ईशान्य मुंबईतील महिला पदाधिका-यांमध्ये वाद झाला होता. तो वाद मिटवण्याची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तो वाद संपतो न संपतो तोच हे नवे राजीनामा नाट्य समोर आले आहे.

COMMENTS