मुंबई – 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या मतदानाच्या तोंडावरच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला फायदेशीर ठरणाऱ्या आगरी सेनेत उभी फूट पडली आहे. आगरी सेनेचे पालघर तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी बंडखोरी करत, बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामरमुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेले राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे आहेत. त्यामुळे गावित यांना पाठिंबा न देता अनिल पाटील यांनी बंडखोरी करत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. पालघर तालुका आगरी सेनेतर्फे केळवे येथे मार्गदर्शन शिबराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाराम साळवी यांनी काही दिवसांपूर्वी पालघर लोकसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र तालुका पातळीवरील आगरी सेनेत फाटाफूट झाल्याने याचा थेट फायदा महाआघाडीला होणार हे निश्चित झाले आहे.
COMMENTS