मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील शिवसेनेच्या 2 विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे. भांडूपचे आमदार अशाेक पाटील आणि वांद्रे पूर्वच्या आमदार तृप्ती सावंत यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दाेघांनाही काल एबी फॉर्म दिले गेले नाहीत त्यामुळे त्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याऐवजी भांडूपमधून रमेश काेरगावकर आणि वांद्रे पूर्वमधून महापाैर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान भांडुप हा मराठी भाषकांचे प्राबल्य असलेला मुंबईच्या पूर्व उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे साहजिकच या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. १९९०, १९९५ आणि १९९९ या सलग तीन विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अॅड. लिलाधर डाके हे निवडून आले होते. त्यानंतर मात्र २००४च्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील हे भांडुपमधून निवडून आले. तसेच सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे शिशिर शिंदे हे मोठ्या मताधिक्याने भांडुपमधून निवडून आले. परंतु याच मराठी मतदारांनी सन २०१४च्या त्यांना निवडणुकीत खाली फेकले. आणि सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला निवडून दिले. शिवसेनेचे अशोक पाटील यांनी भाजपचे मनोज कोटक यांचा पराभव केला होता.
परंतु आगामी निवडणुकीत मात्र पाटील यांना डच्चू दिला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS