मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्रʼ ही कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे ….
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संयुक्त भागीदारी धोरण राबविण्यास मान्यता.
- महाराष्ट्रातील बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी ‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्रʼ ही कंपनी स्थापन करण्यास मान्यता.
- नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त महाविद्यालयातील कार्यरत शिक्षकेतर अधिकारी / कर्मचारी यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मान्यता.
- राज्यातील न्यायालयांना सोयी-सुविधा निर्माण करुन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी.
COMMENTS