मुंबई – आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन झाल्यानंतर ज्या भागात मंगळवारी बंद पाळण्यात आला नाही. त्या भागात बुधवारी बंद पुकारण्यात आला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बुधवारी बंद पुकारण्यात आला आहे. मंगळवारी राज्याच्या सर्व भागात बंदला उत्सुफुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागलं. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सकल मराठा समाजातर्फे बुधवारच्या बंदबाबत मराठा समाजाला काही आवाहन करण्यात आलंय. हा बंद शांततेच्या मार्गेने यशस्वी करावा असंही आवाहन करण्यात आलं आहे.
1)मराठा तरुणानी सदर बंद शांतता पूर्ण वातावरणात पार पाडायचा आहे.
2)मराठा समाजाचा आक्रोश हा सरकार विरोधी आहे त्याला जातीय रंग देऊ नये.
3)कोणत्याही प्रकारच्या इतर समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि सामाजिक तेढ़ निर्माण करण्यापासून स्वताला आणि इतराना आवर घालावा
4)एम्बुलेंस आणि अतिमहत्वाच्या सेवा देणाऱ्या दवाखाने मेडिकल यांना बंद साठी दबाव टाकू नये
5)सदर आंदोलन घोषणा आणि आपला आक्रोश व्यक्त करत असताना अश्लील भाषा आणि अनुचित शिव्या यांचा वापर करू नये
6)पोलीस प्रशासनाशी हुज्जत ना घालता त्यांच्याशी समन्वय साधून आंदोलन यशस्वी करावे
7)इतर समाज बांधवानी कृपया हे आंदोलन शासना सोबत असल्याने मराठा समाजाला सहकार्य करावे जेणे करुण आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागतील
8)भड़कावू पोस्ट वीडियो वायरल ना करता आपल्या आपल्या जिल्ह्यातील समन्वयक मराठा सेवक यांच्याशी संपर्क ठेवून पोलीस प्रशासनाला गैरप्रकार करणाऱ्या लोकांची माहिती द्यावी
9) कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडून आंदोलन चिघळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी
10)पोलीस प्रशासनाने आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण चिघळू देऊ नये
11)महिला आणि मुले यांना त्रास होणार नाही किवा त्यांना इजा होणार नाही यांची काळजी घ्यावी
12)कोणत्याही अफवांवर विशवास ठेवू नये अथवा अथवा गोंधळ माजेल अश्या पोस्ट सोशल मीडिया वर टाकू नयेत
13)कोणत्याही प्रकारे या आंदोलनाला राजकीय वळण लागू देऊ नये आपल्या समस्या सोडवने सर्वपक्षीय नेत्यांची जबाबदारी होती आणि राहील आपण आपल्या हक्कासाठी रस्त्यावर आहे राजकारणासाठी नाही याची जाणीव सर्वानी ठेवून कृति करावी
निवेदक :: सकल मराठा समाज,मुंबई
:: मराठा क्रांती मोर्चा,मुंबई
हे आंदोलन आपली ताकत आणि समाजातील प्रतिमा मलिन करणारी ठरू नये तसेच न्याय मिळून आपल्या समस्या सोडावनारी ठरणार नाही याची काळजी घ्यावी.
COMMENTS