मराठा आंदोलनाची धग, मुंबईत लोकल रोखल्या !

मराठा आंदोलनाची धग, मुंबईत लोकल रोखल्या !

मुंबई – आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. काल झालेल्या महाराष्ट्र बदनंतर आता हे आंदोलन मुंबईत येऊन ठेपलं आहे. या आंदोलनाची धक प्रवाशांना बसत असून ठाणे आणि जोगेश्वीर आंदोलनकांनी लोकल अडवल्या आहेत. जोगेश्वरी स्थानकात आंदोलक रेल्वे रुळांवर उतरल्याने काही वेळेसाठी पश्चिम रेल्वेवरील वाहतूक खोळंबली होती. परंतु अवघ्या काही वेळेतच पोलिसांनी आंदोलकांना रुळावरुन हटवले असून आता पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज (बुधवारी) बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी आक्रमक  पवित्रा घेतला आहे. तसेच ठाण्यातही काही वेळ या आंदोलकांनी लोकल रोखली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आंदोलनाचा चांगलाच फटका आज मुंबईला बसणार असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS