मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर लायक व्यक्ती नेमावी – आदित्य ठाकरे

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर लायक व्यक्ती नेमावी – आदित्य ठाकरे

मुंबई- संजय देशमुख यांना अखेर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदावरुन हटविण्यात आले आहे.  निकालाच्या घोळानंतर उशीरा का होईना आता राज्य सरकारला अखेर जाग आली आहे, असे म्हणवं लागेन. यावरुन पुन्हा एकदा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन जोरदार टीका केली. ‘आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी. तसंच ऑनलाइन मूल्यांकनाचा त्रास विद्यार्थी आणि शिक्षकांना देऊ नये. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं, वर्ष वाया गेलं आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांकडून ‘कुलगुरू हटाव’च्या मागणीने जोर धरला होता. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विद्यापीठ कायद्यातील कलम 11 (14) (ई) प्रमाणे अधिकाराच्या दुरुपयोगाचा ठपका ठेवत कुलगुरू संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकले आहे. विद्यापीठाच्या 160 वर्षांच्या इतिहासात कुलगुरूंवर बडतर्फीची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे.

COMMENTS