मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेदरम्यान पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. आज सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्याना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे. आयडॉलच्या दुसऱ्या पेपरमध्ये तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना लिंक मिळाली मात्र, लॉग इन होत नसल्याने परीक्षा देता आली नाही. हेल्पलाइन क्रमांकावरही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा संभ्रमात पडले आहेत.
सलग दुसरा पेपर पुढे ढकलल्यामुळे
विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
COMMENTS