परभणीः लायसन्सचा एक कायदा असतो, एफआरपीनुसार पैसेही देणार नाहीत आणि आमच्या सारख्यांवर टीका करत राहणार. कारखाना सुरू करण्याचा परवाना मिळवायचा. कोर्टाला पैसे देतो म्हणून सांगितलं आहे तर त्यांनी पैसे द्यावेत. ते दुसऱ्या पक्षाचे आहेत, त्यामुळे ते आमच्यावर टीका करणारच आहेत. त्यांनी जेल भोगली आहे, शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत, असा घणाघाती आरोप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी रासपाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गंगाखेड शुगर कारखान्यावर लादलेल्या जाचक अटींची तक्रार गुट्टेंनी रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासोबत शरद पवार आणि अजित पवारांकडे केली होती. पण याच भेटीत जानकर, गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांचीही तक्रार केल्याची चर्चा आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनी रत्नाकर गुट्टेंवर थेट पलटवार केला आहे.
धनंजय मुंडेंनीच गंगाखेड शुगरचं क्रशिंग सुरु होऊ दिलं नसल्याचा आरोप खुद्द गुट्टे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेडमध्ये पसरवला. त्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं समर्थन मिळवण्यात गुट्टे राजकीयदृष्ट्या यशस्वीही झाले. धनंजय मुंडेंची राजकीय तक्रार गुट्टे-जानकरांनी पवारांकडे केल्याची चर्चा आहे.
COMMENTS