मुंबई – सर्वपक्षीय मुस्लिम आमदारांनी औरंगाबाद दंगलीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. इम्तियाज जलील, वारीस पठाण, अमीन पटेल, अबू आझमी यांनी वर्षा निवास्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. व्हिडिओ फुटेजचे पुरावे सादर करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दंगलीप्रकरणी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी यांच्या अध्यक्षतेखाली आयपीएस अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले असून दंगलीत नुकसान झालेल्यांना शासनाकडून नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
दरम्यान दोषी पोलीस अधिकऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून निरपराधांची सुटका केली जाणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच औरंगाबादला पुढच्या तीन दिवसात नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती करणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS