मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमचा हायकोर्टात जाण्याचा निर्णय !

मुस्लीम आरक्षणासाठी एमआयएमचा हायकोर्टात जाण्याचा निर्णय !

मुंबई – मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी एमआयएम पक्षाने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणार नाही, पण मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी हायकोर्टात जाणार असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.त्यामुळे मराठा समाजानंतर आता मुस्लीम समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.

दरम्यान राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे सरकार असताना मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आरक्षणाची टक्केवारी ७३ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये हायकोर्टाने मराठा आणि मुस्लीम समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली होती. परंतु आता आरक्षणासाठी पुन्हा हायोकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS