मुंबई – महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप आज अखेर जाहीर झालं आहे. मागील दोन दिवसांपासून गृह खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिलं अशी चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह आणि नगरविकास खातं देण्यात आलं आहे. शिवसेनेकडील मुख्यमंत्रीपद, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम तर काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण आणि
राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा ही खाते देण्यात आले आहेत.
कोणत्या नेत्याकडे कोणते खातं?
एकनाथ शिंदेगृह, नगरविकास, वने, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, मृदा व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
सुभाष देसाईउद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास
छगन भुजबळग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्रक विकास, सामजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन
जयंत पाटीलवित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, कामगार, अल्पसंख्यांक विकास,
बाळासाहेब थोरातमहसूल, ऊर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय
नितीन राऊतसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त, जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
COMMENTS