मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील एक मोठी बातमी समोर येत असून राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्रिमंडळात खांदेपालट करण्यात येणार असून गृहनिर्माण, कृषी, रोजगार हमी, उत्पादन शुल्क, कामगार, अल्पसंख्यांक या खात्यांमध्ये खांदेपालट होणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खातेबदल होणार असून शिवसेनेकडे गृहनिर्माण खातं दिलं जाण्याचीही शक्यता आहे. तर त्या बदल्यात कृषीसह एक वाढीव मंत्रिपद राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याचीही माहिती आहे.
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांच्या शपथविधीची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या फेरबदलात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नव्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
COMMENTS