नागपूर – राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारनं भाजप सरकारने घेतलेेे काही निर्णय बदलले आहेत. आणखी एक निर्णय बदलण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकार घेणार आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेणार असल्याची माहिती आहे. अनेक नगरपालिकांमध्ये सत्ता एका पक्षाची तर नगराध्यक्ष दुसर्या पक्षाचा निवडून आलेला आहे, त्यामुळे सत्ता राबवताना गोंधळ होतोय, नगरसेवक नगराध्यक्षाला सहकार्य करत नाहीत. त्यामुळे हा निर्णय बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान सरकारच्या या निर्णयानुसार पूर्वीप्रमाणे नगरसेवक नगराध्यक्ष निवडतील, तर ग्रामपंचायत सदस्य सरपंच निवडणार असल्याची पद्धत पुन्हा लागू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई वगळता सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील चार प्रभाग पद्धत रद्द करणार आहेत. पूर्वीप्रमाणे एक प्रभाग पद्धत लागू करण्याचा महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS