विधानपरिषदेतील १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून यांना मिळणार संधी ? एकनाथ खडसेंचही नाव यादीत?

विधानपरिषदेतील १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून यांना मिळणार संधी ? एकनाथ खडसेंचही नाव यादीत?

मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकार आणणार आहे. याबाबत काल मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित
होते. राज्यपाल नियुक्त १२ नावांना आज मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का याकडे लक्ष लागलं आहे. तसेच राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का याबाबत उत्सुकता लागली आहे.
मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांना दिली आहे. तसेच अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का याबाबत उत्सुकता लागली आहे.

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी कोणती नावं चर्चेत ?

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार असून राष्ट्रवादीच्या यादीत एकनाथ खडसे यांची वर्णी लागणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.

काँग्रेसकडून या नावांची चर्चा

रजनी पाटील

सत्यजित तांबे

नसीम खान

मुझफर हुसेन

सचिन सावंत

मोहन जोशी

राष्ट्रवादीकडून या नावांची चर्चा

राजू शेट्टी याचं नाव यापूर्वीच अंतिम झालं आहे, तर श्रीराम शेटे, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांचं नाव चर्चेत आहे.

COMMENTS