मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता खातेवाटपाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर खातेवाटप लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खातेवाटप जाहीर करतील असं पाटील यांनी म्हटलं आहे. आज किंवा उद्या सकाळपर्यंत हे खातेवाटप जाहीर होणार असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान खातेवाटपामध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे वनविभागाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी गिली जाण्याची शक्यता आहे. परंतु धनंजय मुंडेंचा जलसंपदा विभागासाठी आग्रह असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुजबळही नाखुश असल्याचं म्हटलं जात आहे. तर नवाब मलिक राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय सोडून कामगार मंत्रालयासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे असल्याने ग्रामविकास आणि ग्रामीण भागाशी निगडीत खातं काँग्रेसकडे वळवलं जाण्याची शक्यता आहे.ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले कृषी खाते गुलाबराव पाटील किंवा दादा भुसे यांच्यासारख्या ग्रामीण भागातील
नेत्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जाण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी कृषी खात्याची जबाबदारी सांभाळावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असल्याचं म्हटलं जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात या नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादीचे मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)
अनिल देशमुख – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)
आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
शिवसेनेचे मंत्री
संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ)
गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव)
अनिल परब – मुंबई (विधानपरिषद)
उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी)
आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई)
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर)
दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक)
संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा)
बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती)
राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)
काँग्रेसचे मंत्री
अशोक चव्हाण – भोकर (नांदेड)
के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
अमित देशमुख– लातूर शहर (लातूर)
सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद)
डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)
सुनिल केदार – सावनेर (नागपूर)
यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)
COMMENTS