मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी झाला. त्यामुळे आता खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटप निश्चित करण्यात आलं असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य खातेवाटपाची यादी समोर आली असून त्यानुसार, अजित पवार यांना अर्थ व नियोजन खातं दिलं जाऊ शकतं, तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं? शिवसेनेच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटपएकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म
अनिल परब- सीएमओ
आदित्य ठाकरे- पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
उदय सामंत- परिवहन
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संभाव्य खातीअनिल देशमुख- गृह खातं
अजित पवार- अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील- जलसंपदा
दिलीप वळसे पाटील- कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण
नवाब मलिक- अल्पसंख्यांक
हसन मुश्रीफ- सहकार
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
काँग्रेसच्या मंत्र्यांचं संभाव्य खातेवाटपबाळासाहेब थोरात- महसूल खातं
अशोक चव्हाण- सार्वजनिक बांधकाम
अमित देशमुख – ऊर्जा
वर्षा गायकवाड – महिला व बाल कल्याण
COMMENTS