अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, 35 मंत्र्यांची यादी ‘महापॉलिटिक्स’च्या हाती !

अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, 35 मंत्र्यांची यादी ‘महापॉलिटिक्स’च्या हाती !

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 35 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर 25 मंत्री कॅबिनेट आणि 10 नेते राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

कॅबीनेट मंत्री

अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड,राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख,दादा भुसे,जितेंद्र आव्हाड, संदीपान भुमरे, बाळाळाहेब पाटील,यशोमती ठाकूर, अनिल परब, उदय सामंत, के. सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख, आदित्य ठाकरे,

राज्यमंत्री

अब्दुल सत्तार,सतेज उर्फ बंटी पाटील,शंभूराज देसाई, बच्चू कडू, विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे,राजेंद्र पाटील

पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री

पहिल्यांदाच आमदारपदी विराजमान झालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे पिता मुख्यमंत्री आणि पुत्र मंत्री असं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे शैक्षणिक मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS