मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जवळपास निश्चित, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील हे नेते होणार मंत्री?

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जवळपास निश्चित, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील हे नेते होणार मंत्री?

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचं खातेवाट झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे मंत्रिमंळ विस्तारही लवकरच होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जवळपास निश्चित झाली असून येत्या 24 डिसेंबररोजी हा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या विस्तारात कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिमंडळाची माळ पडणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीतून अजित पवार आणि धनंजय मुंडे, तर काँग्रेसमधून दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित आहे. त्याचबरोबर शिवसेनेतून दिवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

तसेच राष्ट्रवादीमधील धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिली जाण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमधून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमीन पटेल, अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम यांनाही मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

COMMENTS