मुंबई – विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारकडून आज प्रस्ताव आणला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा प्रस्ताव तुर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
आज होणाय्रा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाणार होता. याबाबत काल वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक झाली होती. परंतु आज अचानक सरकारनं हा प्रस्ताव पुढे ढकलला आहे.
दरम्यान राज्यपाल नियुक्त १२ नावांना आज मंत्रिमंडळाकडून मंजुरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार असून राष्ट्रवादीच्या यादीत एकनाथ खडसे यांची वर्णी लागणार का? असा सवालही उपस्थित केला जात होता.यासाठी काही नावं चर्चेत होती.
राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी कोणती नावं चर्चेत ?काँग्रेसकडून या नावांची चर्चा
रजनी पाटील
सत्यजित तांबे
नसीम खान
मुझफर हुसेन
सचिन सावंत
मोहन जोशी
राष्ट्रवादीकडून या नावांची चर्चा
राजू शेट्टी याचं नाव यापूर्वीच अंतिम झालं आहे, तर श्रीराम शेटे, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांचं नाव चर्चेत आहे.
COMMENTS