नंदूरबार – “मी भाजपात प्रवेश केला असता, तर माझी राजकीय कारकिर्द संपुष्टात आली असती. शिवसेनेतच प्रवेश घेण्याचा निर्णय योग्यच होता. भाजपाच गेलो असतो तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती. राजकीय आयुष्यात काही वेळा निर्णय चुकतात. माझा तो निर्णय चुकला असता, असे विधान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते नंदूरबार येथे माध्यमांशी संवाद साधत होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी काॅंग्रेसचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. निवडणुकीनंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांना महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आल्याने ते पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्यावर त्यांनी शिवसेनेतच कायम राहण्याचा निर्णय घेतला. याच मुद्द्यावर बोलताना आज त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले.ता, तर माझी कारकिर्द संपली असती”, असे वक्तव्य महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. ते नंदुरबारमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
COMMENTS