नाभिक समाजाची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मागितली माफी

नाभिक समाजाची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मागितली माफी

कोल्हापुर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

कोल्हापुरातल्या वारणामध्ये काल ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ हा कार्यक्रम झाला. यावेळी नाभिक समाजाच्या विधानाबाबत विचारले असता आपला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘माझ्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाल्याचं लक्षात येताच मी एक पत्रक काढून तात्काळ माफी मागितली होती. समाजापेक्षा मी मोठा नाही. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

COMMENTS