मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने 2 नगरपालिका आणि 4 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर या नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. कोकणातील कणकवली, गुहागर आणि देवरुख तर कोल्हापूर जिल्ह्यातील नव्यानेच निर्माण झालेली आजरा नगर पंचायतीची निवडणूक होणार आहे. येत्या 6 एप्रिलला तिथे मतदान होणार आहे. तर दुस-या दिवशी म्हणज्ये 7 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
या सहाही ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जामनेर ही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मतदारसंघातील नगरपालिका आहे. त्यामुळे जामनेर नगरपालिकेकच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचसोबत कोकणातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गुहागर नगरपंचायत ही माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीत्या निवडणुकीकडे कोकणाचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायीतकडे तर राज्याचे लक्ष लागले आहे. नारायण राणे, शिवसेना आणि सध्या भाजपमध्ये असलेले संदेश पारकर या तिघांमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.
COMMENTS