मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फडणवीस सरकारमधील अनेक निर्णय बदलण्यात आले आहेत. त्यानंतर आता आणखी एक निर्णय ठाकरे सरकार बदलण्याच्या तयारीत आहे. थेट सरपंच निवडणूक रद्द करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केल्या आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांची निवडही आता नगरसेवकांमधून होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज यासंदर्भात प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
दरम्यान कृषी बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांना मिळालेला मतदानाचा अधिकार रद्द होण्याची चिन्हं आहेत. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जात नाही, हे कारण पुढे करत फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला होता.ही पद्धत खर्चिक आणि अव्यवहार्य असल्याचं सांगत ठाकरे सरकार शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार रद्द करण्याच्या बेतात आहे. त्याऐवजी पूर्वीप्रमाणे विविध कार्यकारी सेवा, सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि ग्राम पंचायत सदस्य मतदान करणार आहेत.
COMMENTS