नागपूर – परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं आहे. नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत. 19 पैकी 17 नगरसेवक भाजपचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागी मिळवता आली नाही. बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली.
तसेच परभणीतील मानवतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सखाहरी पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पूजा खरात यांचा त्यांनी 9 हजार 439 मतांनी पराभव केला आहे. पाटील यांना 12 हजार 210 तर खरात यांना मिळाली 2 हजार 771 मते मिळाली आहेत.
दरम्यान उल्हासनगर महापालिकेतील पोटनिवडणुकीत रिपाई आठवले गटाचे मंगल वाघे विजयी झाले आहे. वाघे यांनी भाजप,सेना आणि साई या युतीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजप नगसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध झाल्याने नगरसेवक पद रद्द झाले होते. त्यामुळे
प्रभाग क्रमांक १ च्या पोट निवडणुकीत रिपाई आठवले गटानं बाजी मारली आहे.
COMMENTS