दिल्लीत खलबतं, चंद्रबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची भेट !

दिल्लीत खलबतं, चंद्रबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची भेट !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच सत्ता स्थापनेसाठी दिल्लीत विरोधकांची खओलबतं सुरु झाली आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली आहे. चंद्रबाबू नायडू राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर लखनऊकडे रवाना झाले. तिथे ते मायावती आणि अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरु झाली असल्याचं दिसत आहे. आज चंद्रबाबू नायडू यांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. तसेच लोकसभा निकालादिवशी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे विरोधकांनी निकालापूर्वीच सत्तास्थापनेाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.

COMMENTS