महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंमधील वाद पुन्हा विकोपाला जाणार ?, नामदेव शास्त्रींच्या पत्रामुळे खळबळ !

महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडेंमधील वाद पुन्हा विकोपाला जाणार ?, नामदेव शास्त्रींच्या पत्रामुळे खळबळ !

बीड – भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची चिन्हे आहेत,वंजारी समाजाचा आरक्षण मेळावा आणि बैठक भगवानगड येथे घेण्यात येणार असून अशी सभा किंवा मेळावा झाल्यास कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते असे पत्र महंत यांनी दिल्याने पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे

दरम्यान भगवान गडावरून दरवर्षी घेतला जाणार दसरा मेळावा दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला होता,नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद पराकोटीला गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले होते,गतवर्षी हा मेळावा वादामुळे भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव येथे घ्यावा लागला होता,त्यानंतर पंकजा मुंडे आणि महंत यांच्यातील मतभेद टोकाला गेले होते,पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली होती.

दरम्यान मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी वंजारी समाजाच्या आरक्षणाबाबत एक बैठक भगवानगड येथे घेणार असल्याचे जाहीर केले,त्यानंतर शास्त्री यांनी पाथर्डी तहसीलदार यांना पत्र देऊन या ठिकाणी कराड हे राजकीय हेतूने मेळावा घेणार असुन त्यादिवशी भगवान बाबा यांच्या जयंतीचा कार्यक्रम असल्याने कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू शकतो अशी शक्यता व्यक्त करीत कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असे म्हटले आहे. शास्त्री यांच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे,या पत्रामुळे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाणार अशी चिन्हे आहेत.

COMMENTS