भंडारा – काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी महाजनादेश यात्रा आयोजीत केली गेली होती तेथेच काँग्रेसच्या वतीने ‘महा पर्दाफाश मेळावे’ आयोजीत करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा मांडण्याचे काम नाना पाटोले करीत आहेत. महापर्दाफास यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भंडारा येथील सभेत बोलतांना ते म्हणाले की, २०१४ पासून जर फडणवीस सरकारने खरोखरच सिंचन, शेती, शहर विकास, दुष्काळ, बेरोजगारी निर्मुलन, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, विविध जातीसमुह यांच्या विकासासाठी व समस्या सोडविण्यासाठी काही टक्के जरी काम केले असते तर भाजप सेना सरकारला राज्यात पंचतारांकीत सुविधा उपभोगत महाजनादेश यात्रेची नौटंकी करण्याची गरज भासली नसती. जनता आपल्या कारभारावर प्रचंड नाराज आहे हे या सरकारला पोलीस यंत्रणेकडून समजले आहे. त्यामुळेच हा अवाढव्य खर्च करून जनतेला भुलथापा देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. अशा सरकारच्या भूलथापा व खोटारड्या सरकारला जनता बळी पडणार नाही व त्यांना त्यांची जागा दाखविणार असल्याचे पटोले म्हणाले. मंचावर यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, श्री पांडे, जिया पटेल, मधुकर लिचडे, सीमाताई भुरे, डॉ अशोक ब्राह्मणकर, होमराज कापगते, जिल्हा परिषद सभापति प्रेम वनवे, रेखाताई वासनिक, अजय तुमसरे, जिल्हा महासचिव महेंद्र निंबार्ते, मुकुंद साखरकर, शिशिर वंजारी, रणवीर भगत, राजकपूर राऊत, शंकर तेलमासरे, हंसाताई खोब्रागडे, अनीक जमा पटेल, भूषण टेम्भूर्णे, धनराज साठवणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना नाना पटोले म्हणाले कि,गेल्या अनेक वर्षापासून विनाअनुदानीत शाळेचे हजारो शिक्षक प्रचलित नियमानुसार अनुदान मिळण्यासाठी आंदोलन करीत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीपुर्वी भाजपाच्या नेत्यांनी या शिक्षकांना १०० टक्के अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेऊन सर्व विनाअनुदानीत शाळेचे शिक्षक भक्कमपणे भाजपाच्या पाठीशी उभे राहीले. मात्र पाच वर्ष पुर्ण झाले तरीही या शिक्षकांच्या मागण्या सरकारने पुर्ण केल्या नाही. अनेक वर्ष आंदोलन करुनही न्याय न मिळाल्याने गोंदीया जिल्हयातील केशव गोबडे तसेच नंदुरबार जिल्हातील जितेन्द्र पाटील या दोन शिक्षकांनी न्यायाच्या प्रतिक्षेत प्राण सोडला. राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या सरकारसाठी गंभीर विषय नाही. आता पवित्र काम करणा-या शिक्षकांचा मृत्यू सुध्दा सरकारसाठी गंभीर विषय राहीला नसल्याची टिका नानाभाऊ पटोले यांनी केली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पगाराशिवाय काम करतांना शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परीस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम पडत आहे,असे असतांनाही सरकार या विषयाकडे गंभीरतेने बघत नसल्यामुळे नानाभाऊ पटोले यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
२०१४-१५ पासून राज्यसरकारने राज्यातील जनतेवर पेट्रोल डिझेलवर दुष्काळ कर ४.५० ते ६.५० रूपयांचा जो जिझीया कर लावला आहे तो दरवर्षी आणि गेल्या पाच वर्षात दर वर्षी किती गोळा झाला? एकुण किती गोळा झाला? तो दुष्काळावरच खर्च केला का? नेमका कुठे खर्च केला? त्याची अधिकुत आकडेवारी जाहिर करावी. आमच्या माहितीप्रमाणे दुष्काळ कर म्हणुन राज्य सरकारकडे दरवर्षी ४२०० ते ४८०० कोटी रूपये आणि ५ वर्षात जवळपास १६ हजार ते १८ हजार कोटी रूपये पेट्रोल डिझेल करातून आलेले आहे. हे पैसे नेमके कुठल्या खात्यात जमा केले? कोणत्या नावाने जमा केले? आणि कशासाठी जमा केले याचा हिशोब महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला पाहिजे. पाणी फाऊंडेशन, अनुलोम, औषधी-वैद्यकीय मदत कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय या आणि अशा संस्था/योजना हा राज्यसरकारचा भाग आहे की कसे? यांच्या माफत राबविण्यात येणाऱ्या विवीध योजना या शासकीय आहेत की, एनजीओ की हायब्रीड (शासन यंत्रणा+ फंडींग=वैय्यक्तीक संस्था) याचा खुलासा करावा. या संस्था योजनेचे श्रेय आणि फंडींग नेमके कोणाचे? राज्य सरकार, आणि या संस्था यांचे नेमके नाते संबंध/आर्थिक व्यवहार/ श्रेय व्यवहार/स्पर्धेशिवाय तांत्रिक मनुष्यबळ-कौशल्य, पुर्वानुभवाशिवाय इतरांना डावलून यांच्यावर मेहरनजर असण्याची कारणे काय? महिन्याला केवळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर पन्नास कोटी रुपये खर्च होतात असा आरोपही नानाभाऊ पटले यांनी केला. हा पैसा गोर-गरीब जनतेचा आहे असेही ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोला येथे असतांना सात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. महामार्गामध्ये अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनिचा अत्यंत तोकडा मोबदला त्यांना मिळाला होता. इतर शेतकऱ्यांना मिळालेला जमिनीचा मोबदला व या शेतकऱ्यांना मिळालेली रक्कम यामध्ये प्रचंड तफावत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप होता. त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्यांची दखल न घेतल्याने त्यांनी एवढे मोठे पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराचे हे अपयश आहे. महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्री करत असलेल्या मोठमोठ्या गप्पा किती पोकळ होत्या हे या घटनेतून सिद्ध होते असेही नाना पटोले म्हणाले. यावेळी प्रामुख्याने भूमेश्वर महावाडे, रविभूषण भुसारी, जनार्धन निंबार्ते, महेश कोराम, सुरेश मेश्राम, पूजा ठवकर, सचिन घनमारे, विशाल तिरपुडे, प्रिया खंडारे, उत्तम भागडकर, डॉ चंद्रशेखर निंबार्ते, मंगेश हुमणे, नरेश साकुरे, नाहिद परवेझ, केवळराम बांडेबुचे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष शाहीन मुन, सचिन फाले,भावना शेंडे,भारती निमजे, शालिनी मेश्राम, आशा गिऱ्हेपुंजे, प्रकाश देशमुख, लेकराम ठाकरे, नीलकंठ बागडे, योगेश सांगोडे, सुरेश बागडे, नितेश भेंडारकर, श्रीहरी भेंडारकर, अक्षय भिवगडे, कमल साठवणे, रोशन दहेलकर, साहिल मेश्राम, आकाश मेश्राम, पंकज भोंगाडे, आनंद चिंचखेडे, रोशन केसलकर, रजत रहांगडाले, शुभम सतीभस्की, रोहित माकडे, रोहित नागपुरे, शिवेश कडव, सोनू बागडे, मोनू गोस्वामी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत वाघाये तर आभार प्रदर्शन अनीक जमा पटेल यांनी केले.
COMMENTS