सबसिडी देऊन सरकारकडून शेतक-यांची बोळवण, सरकारविरोधात नीतियुद्धासाठी तयार व्हा – नाना पटोले

सबसिडी देऊन सरकारकडून शेतक-यांची बोळवण, सरकारविरोधात नीतियुद्धासाठी तयार व्हा – नाना पटोले

वाडा – सिबसिडी देऊन राज्य सरकारकडून शेतक-यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. तसेच बहूजनांनी सरकारविरोधात नीतियुद्धाची तयारी करावी असंही नाना पटोले म्हणाले आहेत. इंग्लंड सारख्या देशात शेतीत सरकारची  भागिदारी  85 टक्के आहे. तर  भारतात खते, बियाणे, औषधांवर  सबसिडी देऊन सरकार शेतकऱ्यांची बोळवण करत असून  भागीदारी नाममात्र  असून ही चिंतेची बाब असल्याचही ते म्हणाले आहेत.

देशातील 70 टक्के ग्रामीण व्यवस्था शेतीवर  अवलंबून असून शेतीबाबत सरकारचं धोरण नकारात्मक आहे. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबत नसल्याचंही पटोले यांनी म्हटलं आहे. या आत्महत्या थांबवायच्या असतील तर वेगळं बजेट जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या  सरकारच्या काळात वीज बिले, पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव भरमसाठ  वाढले असून स्वच्छता अभियानात गोरगरीब जनतेलाच मोदी सरकारने  साफ केल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे.

COMMENTS