गोंदिया – भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपनंतर काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोलेंनी गोंदियामध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या राज्यस्तरीय अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात केलं होतं. पंरतु 2017 मध्ये 18, तर 2018 मध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली असून संतांच्या व्यासपीठावर खोटं बोलून संतांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
दरम्यान नाना पटोले यांनी गोंदियातील देवरी पोलीस स्टेशनमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोपही केला आहे.
COMMENTS