नांदेड – नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज गोंधळ झाला आहे. आजच्या बैठकीत अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचा ठराव मांडण्यात येणार होता. परंतु शिवसेनेनं हा ठराव मांडण्यास विरोध केला. यादरम्यान शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पालकमंत्री रामदास कदम यांच्यासमोर काँग्रेस आमदार अमर राजूरकर आणि सेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात धक्काबुक्की झाली असल्याची माहिती आहे.
दरम्यान पालकमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. रामदास कदम पालकमंत्री असले तरी जिल्हा नियोजन समितीत बहुमत काँग्रेसचे आहे. या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा ठराव सभागृहात मांडला. यावर शिवसेना सदस्यांनी आक्षेप घेतला. तसेच निधीवाटपावरुनही वाद निर्माण झाला. काँग्रेस आमदार अमर राजूरकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यात झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन हा वाद मिटवला.
COMMENTS