नांदेड – बिलोली नगराध्यक्ष मैथिली कुलकर्णी यांना पदावरून दूर करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. 2012-13 साली लेखापरीक्षण अहवालात घेतलेले आक्षेप सिद्ध होत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बिलोलीध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. मैथिली कुलकर्णी या जनतेतून पुन्हा एकदा नगराध्यक्षपदावर विराजमान झाल्या होत्या.
बिलोली नगरपरिषदेत २०१२-२०१३ मध्ये शहरात कामे न करताच जवळपास १ कोटींचा भ्रष्टाचार झाला होता. नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी , तत्कालीन मुख्याधिकारी अजित डोके, लेखापाल शंकर जाधव, कारकून ए. जी.कुरेशी, सल्लागार कंत्राटी अभियंता भास्कर शिंदे यांनी संगनमतने रवींद्र नगर शेजारील सागर नरोड यांच्या प्लॉट मध्ये सिमेंट रस्ते, प्रवास न करता प्रवास भत्ता उचलने, शहरातील सिमेंट रस्त्यावर मुरूम टाकणे व मुरूम टाकण्यासाठी बोगस मजुर दाखवून बिलं उचलने अश्या अनेक कामात भ्रष्टाचार केला होता. या प्रकरणी माजी/आजी नगरसेवक व आरटीआय कार्यकर्ता शे. जाकेर यांनी पुराव्यानिशी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर बिलोली न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कस्टडी देखील सुनावली होती.
COMMENTS