नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरण, आजी माजी आमदार, खासदारांच्या अडचणीत वाढ, चौशीचे न्यायालयाचे आदेश !

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरण, आजी माजी आमदार, खासदारांच्या अडचणीत वाढ, चौशीचे न्यायालयाचे आदेश !

नांदेड – नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आजी माजी आमदार, खासदारांच्या अडचणीत वाढ झाली असून या गैरव्यवहाराप्रकरणी आरोपी संचालकांच्या चौकशीचे न्यायालयानं आदेश दिले आहेत. या गैरव्यवहारात आरोपी संचालकांमध्ये विद्यमान आमदारांसह आजी माजी आमदार, खासदार आणि दिग्गज नेतेमंडळींचा समावेश असून क्रांतिकारी जयहिंद संघटनेने न्यायालयात केली याबाबत फिर्याद दाखल केली होती. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार या कलमान्वये चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान विद्यमाना आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास गोरठेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम, माजी खासदार गंगाधरराव कुंटुरकर या संचालकांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत आता वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS