पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याच्या आर्थिक वर्षाचा आराखडा मंजूर !

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याच्या आर्थिक वर्षाचा आराखडा मंजूर !

नंदुरबार – जिल्ह्याचा 2018-2019 या आर्थिक वर्षाचा आराखडा जिल्हा नियोजन समितीनं मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनांचा आराखडा 64.08 कोटी रुपयांचा असून या नियतव्यास मंजुरी देण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 11.40 कोटी रुपये, आदिवासी उपयोजना करीता 450.24 कोटी रुपयांचा, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी 6 कोटी 25 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल याच्या उपस्थितीत हा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

 

दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात नावीण्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करावी. आरोग्य, महिला, पाणीपुरवठा, शिक्षण, मुलांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवार अभियानासह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना तालुका, ग्राम पातळीवर लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. यंत्रणांनी निधी उपलब्ध होताच कामांना सुरवात करावी अशा सूचना यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बैठकीत दिल्या आहेत. तसेच कृषी विभागासह विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करीत योजना गावपातळीवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करुन नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणारा निधी मार्च 2018 अखेर खर्च करावा. निधी खर्च करण्यासाठी नियोजन करावे. प्रशासकीय मान्यता घेत कामांचे कार्यादेश तत्काळ द्यावेत, असेही निर्देश पालकमंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिले.तसेच यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 598 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 33 कोटी रुपयांचा निधी संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांनी दिली.

 

COMMENTS