मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपची ऑफर स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी नारायण राणे हे राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. कालच त्यांनी विधानभवनात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंत या भेटीनंतर त्यांनी याबाबत खुलासा केला नव्हता. परंतु आज आखेर राणे यांनी भाजपची ऑफर स्वीकारत मंत्रिमंडळाऐवजी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान नारायण राणे यांना राज्यसभेऐवजी राज्याच्या राजकारणात राहण्याची इच्छा होती. परंतु भाजपनं भाजप नेतृत्वानं त्यांच्यासमोर राज्यसभेचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत गेली आठ ते दहा दिवसांपासून राणे विचार करत होते. परंतु त्यांनी आज अखेर भाजपचा हा प्रस्ताव मान्य केला असून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्यातरी राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
COMMENTS