नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नागपुरात!

नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नागपुरात!

नागपूर – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या भेटीत नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरातच्या निकालानंतर नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी आज भेटीची वेळ दिली होती.

दरम्यान आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे संकेत दिले होते. तसेच नारायण राणे ऍसेट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. गेली अनेक दिवसांपासून नारायण राणेंना मंत्रिमंडळात समावेश दिला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. याबाबतही संभ्रमाचं वातावरण होतं परंतु हा संभ्रम आजच्या बैठकीत दूर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे.

COMMENTS