“नारायण राणेंची दखल शिवसेनेनं घेतली !”

“नारायण राणेंची दखल शिवसेनेनं घेतली !”

मुंबई – रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली. यावरुन शिवसेनेनं ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची दखल घेतली असल्याचं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट  घेणे हा आमचा विजय असून  आम्ही नाणारमध्ये सभा घेतली. याचा परिणाम दिसून येत आहे.

दरम्यान शिवसेनेला जर  खरंच या रिफायनरीला विरोध करायचा असेल तर  मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात  ग्रीन रिफायनरी आणि सरकार यांच्यात होणारा करार रद्द करून दाखवा, असे आव्हानही नितेश राणे यांनी शिवसेनेला केलं आहे. तसेच नाणार  येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प  हा कोकणाला उद्धवस्त करणारा असून ज्या कोकण पट्ट्याने  शिवसेनेला २४ आमदार देऊन ताकद दिली त्या कोकणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकत्ते उद्धवस्त  करायला निघाले आहेत, अशी टीकाही आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

COMMENTS