नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला निवडणूक

नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला निवडणूक

मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर  नारायण राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. राणेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि आमदारकी सोडली होती.

नारायण भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएला पाठिंबा जाहीर केला.

मतदान कार्यक्रम

अधिसूचना जारी करण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2017
नामनिर्देशनाची अंतिम मुदत – 27 नोव्हेंबर 2017
अर्जांची छाननी – 28 नोव्हेंबर 2017
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – 30 नोव्हेंबर 2017
मतदान – 7 डिसेंबर 2017 – सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतमोजणी – 7 डिसेंबर 2017 – संध्याकाळी 5 वाजता

 

COMMENTS