नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यसभेची ऑफर मान्य ?

नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यसभेची ऑफर मान्य ?

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी विधीमंडळात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच नारायण राणे हे राज्यसभेत जाणार आहेत की नाही हे या भेटीनंतर समजणार असल्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान नारायण राणेंना मंत्रिमडळात स्थान देण्याऐवजी राज्यसभेत जाण्याची ऑफर भाजपनं दिली होती. परंतु राज्यसभेत न जाण्याची इच्छा राणे यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना बोलून दाखवली होती. परंतु नारायण राणे यांनी आज विधीमंडळात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राणे हे राज्यसभेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेत जाणार की राज्यातच राहणार हे त्यांच्या घोषणेनंतरच समजणार आहे.

COMMENTS