नारायण राणेंना भाजपकडून मोठी ऑफर, केंद्रात मंत्रिपद देणार ?

नारायण राणेंना भाजपकडून मोठी ऑफर, केंद्रात मंत्रिपद देणार ?

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांना भाजपनं मोठी ऑफर दिली असल्याची माहिती आहे. राणे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी रात्री राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याचं आश्वानं दिलं असल्याची माहिती आहे.

दरम्यान नारायण राणे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. तसेच ते  काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे नारायण राणे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती आहे.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राणे यांनी आपल्या पक्षासाठी तीन जागांची मागणी केली आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग, माढा आणि औरंगाबाद या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपूत्र नीलेश राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे.पण रत्नागिरी-सिंधुदूर्ग हा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. तर औरंगाबादमध्येही शिवसेनेचेच चंद्रकांत खैरे खासदार आहेत. आता शिवसेना-भाजप युती झाली तर या मतदारसंघाचे काय होणार, ते राणे यांच्या पक्षासाठी शिवसेना या जागा सोडणार का हे पाहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS