मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. पुस्तक लिहायची माझी इच्छा होती. मधूकर भावे अनेकदा सांगायचे. साधारण वर्ष लागले. मी मुंबईत वाढलो. मुंबई कसं जगलो सगळ्यांना माहितेय. ब्रेकींग न्यूजसाठी अनेकांच्या नजरा होत्या. मी ते सगळं गाळून लीहिलं. शिवसेनेत असताना केलं, करायला लावलं, पक्षाच्या दहशतीसाठी केलं. आता काय, आता कमर्शीयल शिवसेना झालीय. तेव्हा काय मिळायचं. वडा पावही मिळत नव्हता. बाळासाहेबांचं नेतृत्व, माझं जे कौतुक केलं ते बाळासाहेबांचं आहे. साहेबांनी घडवलं. तो काळ मी पुस्तकात गाळला. तो त्यांचा होता. तसेच मराठी माणसाच्या हक्कासाठी, कसे शिवसैनिक झालो ते उद्धव ठाकरेला नाही कळणार. आयत्या बीळावर नागोबा असल्याची टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
तसेच मी चिठ्ठी दिली बाळासाहेबांनी वर पाहिलं नाही. मी पाया पडालो गेलो. दुस-या दिवशी बाळासाहेबांनी फोन केला परत येण्यासाठी उद्धव बोलला मी घर सोडून जाईन. मी साहेबांवर जीतकं प्रेम केलं तितकं कुणावरही केलं नाही असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे.
आज नारायण राणेच कौतुक केलं ते माझं नाही बाळासाहेबांचे आहे. बाळासाहेब माझं भाषण ऐकून सांगायचे तो किती फास्ट बोलतो, हळू बोल, साहेबांनी अस घडवलं. त्याच्यातील काळ पुस्तकात गाळला.. वयाच्या 14 व्या वर्षी शिवसेनेत आलो, माझे 20 वर्षाचा मित्र होता, त्याला सांगितलं सदस्य हो, तुझं नाव नारायण राणे आहे. आता लोक बोलतील तुम्ही खोटं बोलले . त्यावेळी एक जिल्हा, एक तालुका सोडला नाही, प्रचार केला. मला गडचिरोली, जम्मू काश्मीर दिल. मी साहेबाना सांगितलं जम्मू काश्मीर नको तिथे गोळ्या खाऊन मारायचं का, आमदार झालो तेव्हा मंत्री व्हायचं होत, मंत्री झालो तेव्हा मुख्यमंत्री बनायचं होत,झालो आता खासदार झालो पण माझ्या मर्जीने झालो नाही. मला दुःख वाटतं माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया गेला, आता ही जातोय, पटत नसलं तरी समर्थनार्थ बोलायचं असत. मी ठरवलेले 60 नंतर रिटायर्ड व्हायचं मग लिहायचं. परिस्थितीमुळे रिटायर्ड होता येत नाही, पण जेव्हा होऊ तेव्हा लिहीन असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच 370 कलम ज्या दिवशी होतं, त्या दिवशी गडकरी व्यस्त होते, मी जेव्हा सांगितलं की पुस्तक प्रकाशन आहे त्यांनी तात्काळ पीएला सांगून वेळ दिला. आपल्या मित्राला आनंद होईल असं वागले. तसेच तावडे आणि शेलार एक फोन वर आले, तटकरे फोन न करता आले. तसेच मुख्यमंत्र्यांनकडे पुस्तक प्रकाशनासाठी वेळ मागितला पण दिला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
COMMENTS