मुंबई – चंद्रशेखर बावनकुळेंनी मला त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण दिले. त्यावेळी माझी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. मला त्यांनी भाजप प्रवेशाचं आश्वासनही दिलं होतं. राणेंना पक्षात योग्य तो सन्मान मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मग नंबर दोनच्या मंत्र्यांची चलबिचल झाली. त्यांना कळलं की माझ्याकडची महत्वाची खाती राणेंकडे जातील, त्यामुळे त्यांनी आडकाठी आणली आणि माझा भाजप प्रवेश रखडला असल्याचा गौप्यस्फोट खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान नारायण राणे यांनी ‘No Hold Barred : My Years in Politics’ नावाचे आपले आत्मचरित्र लिहले आहे. या आत्मचरित्रात त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेतात्यांना टोली लगावला आहे. नंबर दोनच्या मंत्र्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला असल्याचं म्हटलं आहे.
COMMENTS