नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल !

नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल !

सिंधुदुर्ग – नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विकासाच्याबाबतीत जिल्हा गेल्या तीनच वर्षात दहा वर्षे मागे गेला असल्याची टीका त्यांनी सरकावर केली आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं जाहीरनाम्यात केलेल्या एकाही घोषणेची पुर्तता केली नसल्याचं राणे म्हणाले आहेत. तसेच कोकणात होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प जर पर्यावरणाला घातक ठरणारा असेल, तर तो प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.तसेच लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाबाबत बोलताना, राणे यांनी आपण लवकरच मंत्रिमंडळात असू, असा दावाही केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 3 विधानसभा आणि लोकसभेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून स्वाभिमान पक्षाची नोंदणी 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याचंही नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे.

तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली सून आरोग्याच्याबाबतीतही भयावह स्थिती झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसून महसूल खात्यात तर दाखल्यासाठी पैसे दिल्याशिवाय काहीही मिळत नाही. समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नाहीत. तसेच जिल्ह्यातील विकास ठप्प झाला असून 2018 सुरू झालं तरी हे सरकार आणि पालकमंत्री विमानतळ सुरू करू शकले नाही. सिवर्ल्ड सुरू करण्यासाठी कोणतेही प्रयत्न पालकमंत्री करत नसल्याचा आरोपही राणे यांनी केला  त्यावेळी केला आहे.

COMMENTS