मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना आरक्षणातलं काय कळतं, घटनेतील कोणत्या कलमांतर्गत आणि कसे आरक्षण देता येईल हे त्यांनी सांगावे अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. रत्नागिरीतील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात राणे यांनी टीका केली आहे.
दरम्यान मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात ३४ टक्के मराठा समाज असून यातील २० टक्के समाज दारिद्य्रात आहे. अशा लोकांसाठी मी अभ्यास करुन अहवाल सादर केला. या आधारे आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. पण राज्यात सत्तेवर येताच शिवसेनेने हे आरक्षण काढून घेतले. शिवसेनेमध्ये आज अनेक मराठा आमदार, खासदार आहेत. पण ते फक्त पदाला चिकटले आणि जात विसरले असल्यची जोरदार टीका राणे यांनी केली आहे.
COMMENTS