मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अखेर मंत्रिपद मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नारायण राणे यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. राणे यांना राज्यसभेवर पाठवायचं आणि शिवसेनेचा राज्यातला विरोध मोडून काढायचा असा डबल गेम खेळण्याचा निर्णय भाजप श्रेष्ठींनी घेतला असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या वाढत्या विरोधामुळे राणे यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेणं आणि राणेंनाही फार काळ आशेवर ठेवणं भाजपला परवडणारं नसल्यामुळेच राणेंना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे.
काँग्रेस सोडल्यानंतर अनेक दिवसांपासून नारायण राणे हे मंत्रिपदाची वाट पाहत आहेत. परंतु शिवसेनेचा वाढता विरोधामुळे राज्य मंत्रिमंडळात राणेंची वर्णी न लावता त्यांना राज्यसभेवर निवडून आणून त्यांचं तात्पुरतं का होईना समाधान भाजपकडून केलं जाणार आहे.
COMMENTS