मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री ठाकरेंनी राणे यांची तुलना बेडकाशी करत, एक बेडूक आणि त्याची दोन पिल्ल डराव डराव करत असल्याचं म्हटलं होतं. यावर नारायण राणे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, तसेच राणे कुटुंब आणि भाजपवर टीका कराल तर याद राखा. गेल्या 40 वर्षात जे पाहिलं-ऐकलं ते बाहेर काढेल तर पळता भूई थोडी होईल, असा इशारा नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
राणेंच्या पत्रकार परीषदेतील महत्त्वाचे मुद्दे
असा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात होणं हे दुर्दैव आहे आणि आमच्या पंतप्रधान यांना बोलला तर आम्ही शांत बसणार नाही. मुख्यमंत्री म्हणून तुला मान सन्मान आहे का?, खेळण्यातला मुख्यमंत्री आहे हा, कटपुतली दुसऱ्याच्या हातात नाचते पण याला नाचताही येत नाही.
हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार यांना नाही,मुख्यमंत्री झालेत ते केवळ मोदी साहेबांच्यामुळे. 56 आमदारांवर बेईमानी करून पद मिळवलं आहे. Cbi बद्दल आपल्या पुत्राला क्लिनचिट दिली अजून cbi चे रिपोर्ट आले नाहीत. खुन्याचे आरोपी गजाआड जातील लवकरच कळेल की सुशांतला कशाने मारलं.
दिशावर बलात्कार करून मारलं हेही बाहेर येईल.
दुसऱ्याच्या मदतीशिवाय हा माणूस काहीही करू शकत नाही. कोरोनामध्ये पिंजऱ्यामध्ये होता परवा कुठे एक दौरा केला. घरात बसून राज्य चालवतो थोडं तरी काही वाटलं पाहिजे होतं.
वाघ आहे म्हणता मग पिंजऱ्यामधला की बाहेरचा हेही सांगा. मला बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केला वाघ म्हणून बेडूक म्हणून नाही.
तुमची भाषा बदलली नाही तर आमचा तोल गेला तर आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही बोललो तर पळता भुई थोडी होईल कपडे हातात घेऊन पळाल. निवडणूकीच्या अगोदर हिंदुत्व आणि नंतर काय? काय केलं यांनी मराठी माणसांसाठी. मोदींनी जे काही केल ते समोर आहे. असंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल जी भाषा वापरली ती अत्यंत चुकीची आहे. एवढाच सामना करायचा असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. वेळ आणि ठिकाण सांगा आम्ही येऊ. मग समजेल’, असं थेट आव्हान निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तसेच अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोण अडकलं आहे? हे सर्वांना माहिती आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा योग्य तपास झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS