मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कोकणातील पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राज ठाकरे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय राणे यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्रित येऊ शकतात असं बोललं जात आहे.
दरम्यान मालवण येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान बोलत असताना राणे यांनी आपल्या मागील पराभवाबाबत खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालो. याच मतदारसंघातून सहा वेळा आमदार झालो. मात्र, सहा वेळा आमदार राहिलेल्या मतदारसंघातच पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांच्याकडून झालेला पराभव मी कधीही विसरू शकणार नाही. १९९० पासून मला ८० टक्केच्यावर मत मिळायचे. मात्र लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली असून महिन्याभरात सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून मतांची ८० टक्के मते कशी मिळवता येतील यासाठी प्रयत्न करा असं आवाहनही राणे यांनी यावेळी केले आहे.
COMMENTS