मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आणखी एक मेगाभरतीचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आहे. 22 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता ही मेगाभरती होणार असून यावेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळातल्या सभागृहात हा पक्ष प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या तारखेला कोणाकोणाचा प्रवेश होणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत.भाजपात जाण्याचा निर्णय का घेतोय ते बैठकीत सांगितलं. सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि राहणार.भाजप प्रवेश कधी होईल हे आता सांगू शकत नाही, पण येत्या 8 दिवसात तो होईल असं राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच युती होऊ दे नको होऊ दे मला त्याच्याशी कर्तव्य नाही. माझं बोलणं भाजप नेते आणि मुख्यमंत्र्याशी झालंय. आणि त्यामुळे प्रवेश ते देणार आहेत. ते तारीख डिक्लेर करतील. युती होईल की नाही हा माझा विषय नाही, त्यामुळे मला त्यावर भाष्य करायचे नाही. उद्या जर माझा प्रवेश असेल तर अशावेळी माझ्या कार्यकर्त्याला अंधारात ठेवून मी निर्णय करणं योग्य वाटत नाही. आणि म्हणून त्यांचे मत जाणून घेतले. सर्वांनी अनुमती दिली. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाताना माझ्यासोबत आले, काँग्रेस सोडून पक्ष काढला तेव्हाही माझ्यासोबत आले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते माझ्याबरोबर भाजपात येतील असंही राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मी शिवसेना कोकणात आणली, मी काँग्रेसमध्ये आलो तेव्हा इथे काँग्रेसचे आमदार खासदार निवडून आणले. आता यावेळेला भाजपने प्रवेश दिल्यास दोन्ही जिल्ह्यात भाजपचे खासदार आमदार नाहीत. पुढच्यावेळी ते भाजपचेच दिसतील असा विश्वास मी देतो असंही राणे म्हणाले आहे.
नाणार प्रकल्पाबाबत भूमिका?
तसेच नाणार प्रकल्पाबाबत मी भाजपात गेल्यावर जाहीर करेन.एवढी घाई कशाला ? दोन तीन दिवसांत नाणार प्रकल्प होणार नाहीये.भाजपने काय कमिटमेंटन्स दिल्या आहेत हे आता सांगावे अशी आजची परिस्थिती नाही. अगोदर सांगू नये असं.
प्रश्न – नाणार विषयावर शिवसेनेचे काय मत आहे ?
उत्तर – दर तासाला ते भूमिका बदलतात.शिवसेनेच्या बदललेल्या सुराचा माझ्याशी काय संबंध ? मी दखलही घेत नाही त्यांच्या स्टेमेंट्सची.
प्रश्न – काँग्रेस-राष्ट्रवादीतुन होणारी पक्षांतर कशी पाहता ?
राणे – सध्याचे वातावरण जे आहे ते पाहता, लोकशाहीत निवडणूका होत आहेत ते पाहाता असंच घडणार असं मला वाटतं. प्रवेश असेच होणार. नेते इकडून तिकडे जात राहणार.याला नैतिकता कुठे आहे असं वाटत नाही.पण ते निर्णय घेतले जातात.
COMMENTS