त्यामुळे नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार,काँग्रेस नेत्याचं सुचक विधान!

त्यामुळे नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार,काँग्रेस नेत्याचं सुचक विधान!

अहमदनगर – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे हे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आसल्याचं सूचक विधान  माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. नारायण राणेंचं मन भाजपात रमत नाही. त्यांना आजही चुकल्या चुकल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता थोरात यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगरमधील नेवासा येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

दरम्यान नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद वाढत चालला असल्याचं दिसत आहे. अशातच आगामी नवडणुकीत शिवसेनेची युती होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे नारायण राणे हे भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये जाऊ शकतात असं बोललं जात आहे. अशातच बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा काँग्रसची वाट धरतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS