मुंबई – नाणार प्रकरणावरुन भाजप शिवसेनेत तणाव निर्माण झालेला असताना आता नारायण राणे यांनीही भाजपला इशारा दिलाय. नाणार प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. कोकणी माणसावर हा प्रकल्प लादू नये. वेळ आली तर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा फेकून देईन या शब्दात नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिवेसनेमध्ये आणि माझ्यात फरक आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगेळे आहेत. शिवसेनेला सरकारमध्ये काहीही किंमत नाही. काल मुंबईत मोदींनी उद्योगपतींची बैठक घेतली. त्या बैठकीला शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित नव्हते. त्यांना या बैठकीचं निमंत्रणच नव्हतं. त्यामुळे त्याची सरकारमध्ये किती किमंत आहे याचा आणखी एक पुरावा असल्याचा टोलाही राणे यांनी शिवसेनेला हाणला आहे. नाणार प्रकल्पावरुन ते केवळ पोकळ धमक्या देत असल्याचंही राणे म्हणाले.
COMMENTS